28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीय१ जूनलाच केरळमध्ये मान्सून दाखल होणार

१ जूनलाच केरळमध्ये मान्सून दाखल होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाच्या संकटात संपूर्ण देश अडचणीत असताना शेतक-यांसाठी मात्र एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा देशात पावसाचे आगमन वेळेत होणार आहे. १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. तर राज्यात १० जूनपर्यंत तळ कोकणामध्ये आणि मुंबईत पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

शेतक-यांसाठी आनंदाची अशी बातमी या माध्यमातून आली आहे. देशात आणि राज्यात मान्सूनचे वेळेत आगमन होणार असून, समाधानकारक असा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशाचा विचार करता १ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. म्हणजे वेळेत पावसाचे आगमन होईल. तर राज्यात तळकोकणामध्ये आणि मुंबईत १० जूनपर्यंत मान्सून दाखल होईल. तर १५ ते २० जून दरम्यान मान्सून उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनिल कांबळे यांनी ही माहिती दिली आहे.

एकीकडे मान्सून वेळेत दाखल होणार असल्याची शेतक-यांसाठी आनंदाजी गोष्ट असतानाच अवकाळी पावसामुळे शेतक-यांवर आगामी काही दिवसांत संकट येण्याचीही शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसंच विजेच्या कडकडाटासह मध्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूर वेध शाळेने वर्तवली आहे. तर ६ ते १० मे दरम्यान नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात वादळी वारे वाहण्याचा इशारा दिला असल्याने संत्रा उत्पादक शेतक-यांची चिंता वाढली आहे.

हवामान विभागाने जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत चांगलया पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून विभागाच्या मते यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून ९८ टक्के कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या संकटामुळे नागरिक, प्रशासन, सरकार सगळेच हैराण झाले आहेत. मात्र या संकटाच्या काळातही संपूर्ण देशाची घडी देशातल्या शेतक-यामुळे काहीशी चांगली राहिली आहे. त्यामुळे जर शेतकरी सुखात राहिला तर अशा मोठ्या संकटावरही आपण मात करू शकतो.

जमिनीच्या मालकी हक्कासाठी दोन बहीणींचे तहसीलसमोर आमरण उपोषण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या