22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeराष्ट्रीयराज्यसभेतून आणखी तीन खासदार निलंबित

राज्यसभेतून आणखी तीन खासदार निलंबित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या तीन खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये आपचे दोन खासदार संदीप पाठक आणि सुशील गुप्ता यांचा समावेश आहे.
याशिवाय अपक्ष खासदार अजितकुमार भुयान यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. बुधवारी संजय सिंह यांनाही निलंबित केले होते. राज्यसभेच्या कामकाजात आतापर्यंत २३ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
संजय सिंह यांच्याशिवाय आज निलंबित केलेल्या तीन खासदारांना या आठवड्यापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. पुढील आठवड्यापासून म्हणजेच सोमवारपासून हे खासदार सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतील. याशिवाय मंगळवारी निलंबित केलेल्या १९ खासदारांवर चालू आठवडाभरासाठी कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वी लोकसभेतील ४ खासदारांना गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. निलंबित केलेल्या खासदारांमध्ये टीएमसीच्या ७ आणि द्रमुकच्या ६ खासदारांचा समावेश आहे. निलंबन झाल्यापासून खासदार संसदेच्या आवारात धरणे देत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या