25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयजूनमध्ये दररोज २ हजारांपेक्षा अधिक मृत्यू

जूनमध्ये दररोज २ हजारांपेक्षा अधिक मृत्यू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी तत्काळ योग्य प्रयत्न करण्यात आले नाही, तर, भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासंदर्भात लॅन्सेट कोविड-१९ कमिशनकडून एका अहवालामध्ये माहिती प्रकाशित झाली आहे. अहवालानुसार सध्याच्या कोरोनावाढीच्या वेगानूसार जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोनामुळे रोज २,३२० रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो.

अहवालात महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात या देशातील सर्वाधिक प्रभावित राज्यांचा समावेश केला आहे. जर त्याच्यात अन्य राज्यांतील कोरोना संसर्गाची आकडेवारी मिसळल्यास हा आकडा कदाचित अधिक मोठा असू शकतो.

असिम्पटोमॅटिक रुग्णांमुळे संसर्गात वाढ
फेब्रुवारीपासून रोज येणारे १०,००० रुग्ण वाढून एप्रिलपर्यंत ८०,००० होण्यात ४० दिवसांपेक्षाही कमी कालावधी लागला. तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा कालावधी ८३ दिवसांचा होता. या प्रचंड वाढीसाठी हे असिम्टोमॅटिक अथवा हलके लक्षण असणारे रुग्ण कारणीभुत आहेत.

ट्विटर सेवा ठप्प; युजर्सची तक्रार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या