24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्रात ४ हजारांहून कोरोनाबाधित सापडले

महाराष्ट्रात ४ हजारांहून कोरोनाबाधित सापडले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्येत होणा-या वाढीमुळे चौथी लाट आल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी पाहून प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ४ हजार २५५ रुग्ण आढळले. महाराष्ट्रात सध्या २० हजार ६३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मुंबईत २ हजार ३६६ कोरोनाबाधित सापडले आहेत.

कोरोना संक्रमणामुळे राज्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईतील संक्रमण दर १५.११ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दिल्लीत मागील १० दिवसांत ७ हजार १०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. दिल्लीत ७ जूनला संक्रमण दर १.९२ टक्के होता तो वाढून आता ७.०१ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

केरळमध्ये बुधवारी कोरोनाचे ३ हजार ४१९ नवीन रुग्ण आढळले. केरळमध्ये १८ गजार ३४५ सक्रीय रुग्ण आहेत. मागील २४ तासांत देशात कोरोनामुळे ११ मृत्यू झालेत. ज्यात केरळमधील ३ आणि महाराष्ट्रातील २ रुग्णांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या