27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयरुग्णांमध्ये ६ पेक्षा जास्त प्राणघातक विषाणू

रुग्णांमध्ये ६ पेक्षा जास्त प्राणघातक विषाणू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील ३९ हॉस्पीटलमध्ये भर्ती असलेल्या रूग्णांमध्ये ६ पेक्षा जास्त जिवघेणे विषाणु आढळले आहेत. महत्त्वाचे म्हणजे नॉन-कोविड रुग्णांमध्येही हे आढळून आले आहेत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एपिडेमियोलॉजी विभागाने अँटीमायक्रोबियल सर्व्हिलन्सच्या रिपोर्टमध्ये हे उघड झाले आहे. एस्चेरिचिया कोलाय बॅक्टेरिया सगळ्यात जास्त रुग्णांमध्ये आढळून आला आहे.

क्लेबसिएला, एसिनेटोबेक्टर बामनिया, स्यूडोमोनास एरुगिनोसा व स्टैफिलोकोकस ऑरियस सारखे विषाणु सापडले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२१ याकाळात, दिल्ली एम्ससारख्या वैद्यकीय संस्थांमध्ये दाखल झालेल्या ९५७२८ रुग्णांच्या तपासणीच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.

आयसीयू विषाणुचा धोका
आयसीयू विषाणु निरोगी लोकांमध्ये आढळत नाहीत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना याचा धोका जास्त असतो. महत्त्वाचे म्हणजे आयसीयू मध्ये संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. कोरोनाच्या दुस-या लाटेत दाखल झालेल्या लाखो रुग्णांमध्ये क्लेबसिएला बॅक्टेरिया असण्याची शक्यता होती.

लघवीच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे
महामारीमध्ये रक्त आणि लघवीचे संक्रमण सर्वात जास्त दिसून आले. रक्त संक्रमणामुळे मृत्यूचे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक आणि मूत्र संसर्गामुळे २८ टक्के इतकी आहे. गंभीर स्थिती आणि इतर वैद्यकीय कारणे देखील मृत्यूमागे असू शकतात.

४९ टक्के रुग्णांमध्ये साल्मोनेला आणि शिगेला
जास्तीत-जास्त रुग्णांमध्ये आतड्यांसंबंधी जीवाणू नोंदवले गेले आहेत. यामध्ये साल्मोनेला आणि शिगेला (४९.५ टक्के) यांचा समावेश आहे. तर बॅसिली (२७.४ टक्के), स्टॅफिलोकॉसी (१२ टक्के), एन्टरोकोकी (५.९ टक्के), बुरशी (३.६ टक्के), टायफॉइड साल्मोनेला (०.५ टक्के) आणि स्ट्रेप्टोकॉकी (०.४ टक्के) जीवाणूही आढळून आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या