24.8 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeराष्ट्रीयसायबर फसवणुकीत बळी ठरले सर्वाधिक भारतीय

सायबर फसवणुकीत बळी ठरले सर्वाधिक भारतीय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आधुनिक युगात विज्ञानाने अनेक सुखसोयी दिल्या तेवढेच धोके सुध्दा निर्माण केले आहेत़ मोबाईल फोनच्या युगात मोबाईलनेही अनेक कामे मार्गी लावले आहेत़ तर मोठे नुकसानही केले आहे़ जगभरात सायबर क्राईम मोठे डोके वर काढले असून, जगातील अनेक नागरिक या फसवणुकीला बळी पडले आहेत़ एका सर्व्हेनुसार जगात आतापर्यंत झालेल्या सायबर फसवणुकीत भारतीय नागरिकच जास्त बळी पडले आहेत़ सायबर फसवणुकीत बळी पडणा-यांच्या संख्येत भारतीय पहिल्या क्रमांकावर आहेत़ यानंतर अमेरिका आणि मेक्सिकोचा क्रमांक लागतो़

जगभरात सायबर घोटाळ्यांमधून पैसे गमावलेल्या लोकांपैकी सर्वाधिक संख्या भारतीयांमध्ये जास्त आहे. सायबर घोटाळ्यांमधून एक तृतीयांश भारतीयांनी आपले पैसे गमावले आहेत. मायक्रोसॉफ्टच्या ग्लोबल टेक सपोर्ट स्कॅम रिसर्च अहवालात ही बाब समोर उघड झाली आहे. करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, २०१८ च्या १४ टक्के तुलनेत २०२१ मध्ये ३१ टक्के भारतीयांनी जास्त पैसे गमावले. २०१८ मध्ये जागतिक सरासरी ६ टक्के होती, जी २०२१ मध्ये वाढून ७ टक्के इतकी झाली आहे. भारतानंतर सायबर घोटाळ्यांमधून अमेरिका, मेक्सिको आणि ऑस्ट्रेलियामधील ब-याच लोकांची फसवणूक झाली आहे.

भारतीय सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
भारतात सायबर क्राईमसह फोन घोटाळ्यांच्या प्रकरणात देखील वाढ झाली आहेत. करण्यात आलेल्या संशोधन अहवालानुसार सन २०२१ मध्ये ५१ टक्के लोकांना मोबाइलवर पॉप-अप विंडोज किंवा जाहिराती मिळाल्यात. यापैकी ४८ टक्के लोकांनी या फसव्या जाहिरातींवर क्लिक केले आणि ते वेबसाइटवर रीडायरेक्ट झाले. या व्यतिरिक्त, ४२ टक्के भारतीयांना फसवणुकीची ईमेल देखील आले. तर ३१ टक्के भारतीयांना फसवणूकीचे कॉल आले होते जे २०१८ मध्ये २३ टक्के भारतीयांना रिसिव्ह केले आणि या फसवणूकीला बळी पडले.

भविष्यात अधिक सायबर हल्ले होण्याची शक्यता
या सर्वेक्षणात असे स्पष्ट झाले की, २०२१ मध्ये ४७ टक्के लोक मोठ्या प्रमाणात फसव्या कॉल्सवर अवलंबून राहून ते त्यावर विश्वास ठेवू शकतात. त्यामुळे भविष्यात देखील अशा प्रकारचे सायबर फसवणूकीचे हल्ले अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जगातील १६ देशात करण्यात आले सर्व्हेक्षण
सन २०१८ मध्ये ही संख्या ३२ टक्के होती. त्यात आता वाढल्याचे समोर आले आहे. हे सर्वेक्षण जगातील १६ देशांमधील १६,२५४ प्रौढ इंटरनेट युजर्सवर ६-१७ मे २०२१ दरम्यान करण्यात आले होते. या सर्वेक्षणावरून जगातील सर्वाधिक भारतीयांसोबत सायबर फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

दयाल धानोरा येथील वन महामंडळाच्या जंगलात अवैध सागवानाची तस्करी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या