25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्रात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून राष्ट्रपती राजवट लावावी-खासदार नवनीत राणा

महाराष्ट्रात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून राष्ट्रपती राजवट लावावी-खासदार नवनीत राणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ‘महाराष्ट्रामध्ये कोणाची परिस्थिती आहे ती सांभाळण्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्णपणे अपयशी झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून राष्ट्रपती राजवट लावावी’ अशी मागणीच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘राज्यातील कोरोनाची परिस्थितीत हाताळण्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपयशी ठरले आहे’, असा आरोपच नवनीत राणा यांनी केला आहे. त्याचबरोबर बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेच्या वादावरही पुन्हा एकदा नवनीत राणा यांनी भाष्य केले आहे. ‘जे आरोप-प्रत्यारोप सुरू आहे त्यामध्ये कंगना राणावत यांनी फक्त आपल्याबद्दल बोलावं, इतरांबद्दल बोलू नये. ज्या बॉलिवूड क्षेत्राने आपले जीवन उभे केले त्याबद्दल कटाक्ष करू नये, असा सल्लाही राणा यांनी कंगनाला दिली.

याआधीही नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसैनिकांनी माजी सैन्य अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. या प्रकरणावरही राणा यांनी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करावी यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. तसंच, ‘शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांचे समर्थन केले आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तासात या सगळ्या मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांची जामीन दिला आहे. यावरून मुख्यमंत्र्यांचं सुद्धा या मारेकऱ्यांना समर्थन आहे, असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी’, अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली होती.

एवढंच नाहीतर कंगना राणावतच्या कार्यालयावरील अनधिकृत बांधकामावर मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडफोडीची कारवाई केली होती. तेव्हाही नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीका केली होती. ‘राज्य सरकारने कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केली. सत्तेत असल्यामुळे दुरुपयोग करून ही कारवाई करण्यात आली आहे. ही हुकूमशाही योग्य नाही’, अशी टीका नवनीत राणा यांनी केली होती.

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा; ५ पेक्षा अधिक कार्यकर्ते जमल्यास गुन्हा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या