23.4 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeराष्ट्रीयखासदार प्रज्ञा ठाकूरचे राहुल गांधीविरोधात वक्तव्य

खासदार प्रज्ञा ठाकूरचे राहुल गांधीविरोधात वक्तव्य

एकमत ऑनलाईन

भोपाळ : भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींबद्दल म्हटले की- परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त होऊ शकत नाही. परदेशात बसून राहुल सांगत आहेत की, आम्हाला संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही. यापेक्षा लज्जास्पद काहीही असू शकत नाही. मला अशा राहुल गांधींचा तिरस्कार आहे. त्यांना आता राजकारणात संधी देऊ नये. देशाबाहेर हाकलले पाहिजे.

भोपाळच्या खासदार शनिवारी भोपाळ-दाहोद ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पोहोचल्या होत्या. त्यांनी राहुल गांधींच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शनिवारपासून संत हिरडाराम नगर (बैरगढ) रेल्वे स्थानकावर पाच रेल्वेगाड्यांना हॉल्ट देण्यात येत आहेत. संसदेत चांगले काम सुरू आहे. सर्व काही ठीक आहे, पण काँग्रेसचे लोक सरकार चालू देत नाहीत.

संसदेचे कामकाज चालू दिले जात नाही. संसद चालली तर आणखी कामे होतील, असे त्यांना वाटते. कामे जास्त झाली तर आपले अस्तित्व टिकणार नाही. त्यांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, परंतु त्यांची बुद्धिमत्तादेखील दूषित होत आहे. तुम्ही (राहुल गांधी) या देशाचे नेते आहात. तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे. तुम्ही जनतेचा आणि देशाचा अपमान करत आहात.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या