27.5 C
Latur
Friday, December 4, 2020
Home राष्ट्रीय केरळमध्ये फळे, भाजीपाल्यांना एमएसपी

केरळमध्ये फळे, भाजीपाल्यांना एमएसपी

एकमत ऑनलाईन

थिरुवनंतपुरम : केरळ सरकारने फळे आणि भाज्यांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निश्चित केली आहे. अशाप्रकारे भाज्यांसाठी एमएसपी निश्चित करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. केरळमधील शेतक-यांना सरकारकडून भाज्यांसाठी देण्यात येणारे आधारभूत मूल्य हे उत्पादन शुल्काच्या २० टक्के अधिक असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ही योजना एक नोव्हेंबरपासून राज्यभरात लागू होणार असल्याची माहिती दिली आहे.
विजयन यांनी या योजनेची ऑनलाइन माध्यमातून सुरुवात करताना अशा प्रकारे पहिल्यांदाच एखाद्या राज्य सरकारकडून शेतक-यांना भाजी पिकांसाठी एमएसपी देण्यात येणार आहे.

केरळमधील शेतक-यांना १६ भाज्यांसाठी किमान आधारभूत मूल्य निश्चित करण्यात आले आहे. पहिल्यांदाच एखाद्या राज्य सरकारने असा निर्णय घेतला असून या निर्णयाचा केरळमधील शेतक-यांना फायदा होईल. एमएसपीमुळे शेतक-यांना दिलासा आणि आर्थिक मदत मिळेल. शेतक-यांची मिळकत वाढण्यासाठीही मदत होईल. शेतक-यांना होणारे नुकसान ब-याच प्रमाणात कमी होऊन शेतक-यांना शेतीमधील उत्पन्नासंदर्भात अधिक विश्वास निर्माण होईल, असे मत विजयन यांनी व्यक्त केले आहे. विजयन यांनी बाजारामधील मूल्य हे किमान किमतीपेक्षा खाली गेल्यास शेतक-यांना एमएसपी म्हणजेच हमीभाव देण्यात येईल. त्यांचा शेतमाल सरकारच्या माध्यमातून एमएसपीवर खरेदी केला जाईल. मालाच्या गुणवत्तेनुसार वर्गीकरण करून एमएसपी निश्चित करण्यात येईल. देशभरातील शेतकरी असंतुष्ट आहेत. मात्र केरळ सरकार कायमच शेतक-यांच्या पाठीशी उभे राहिले आहे.

त्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच फळांचे उत्पादनही चांगले आहे. शेतकरी हिताचा विचार करून राज्य सरकारने १६ भाज्या आणि ५ फळांसाठी किमान आधारभूत मूल्य जाहीर केले आहे. याचा फायदा शेतक-यांना होणार आहे. अर्थात, भाजीपाला, फळांच्या दरात मोठी घसरण झाल्यास शेतक-यांना या एमएसपीचा फायदा होतो.

साडेचार वर्षांत राज्यात भाज्यांचे उत्पादन दुप्पट
ळमागील साडेचार वर्षांच्या कालावधीत सरकारने शेती संबंधित अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यामुळेच या कालावधीत केरळमधील भाज्यांचे उत्पादन दुप्पट झाले आहे, असे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटले आहे. भाज्यांचे उत्पादन हे ७ लाख टनांवरून १४ लाख टनांपर्यंत वाढल्याचे सांगण्यात आले आहे.

केरळमध्ये एकूण २१ फळे, भाज्यांचा एमएसपी निश्चित
ळकेरळ सरकारने खाण्या-पिण्यासंदर्भातील एकूण २१ गोष्टींचे आधारभूत मूल्य निश्चित केले आहे. राज्यामध्ये केळ््यासाठी ३० रुपये प्रतिकिलो, अननसासाठी १५ रुपये प्रतिकिलो, तापियोकासाठी १२ रुपये प्रतिकिलो आणि टोमॅटोसाठी ८ रुपये प्रतिकिलो हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. कर्नाटकमध्येही अशाप्रकारे शेतक-यांना हमीभाव देण्यासंदर्भातील विचार सुरू आहे, तर पंजाबमध्ये शेतक-यांनी भाज्या, फळांसाठी हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्रातही मागणी
शेतक-यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाल्यास शेतक-यांना आर्थिक लाभ होण्यास मदत मिळते. यासाठी शेतकरी आणि शेतकरी नेत्यांकडून सातत्याने मागणी केली जाते. मात्र, सरकार ठराविक उत्पादनांनाच हमी देते. त्यामुळे भाव पडल्यास शेतक-यांना आर्थिक फटका बसतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही द्राक्ष, टोमॅटो आणि कांद्यासारख्या पिकांना राज्य सरकारने हमीभाव द्यावा, अशी मागणी केली जाते.

दिल्ली विद्यापीठ कुलगुरूंचे निलंबन

ताज्या बातम्या

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील...

लातूर जिल्ह्यात ५३ नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी...

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २०२२ सालच्या मोसमात महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. ही स्पर्धा बर्मिंगहॅम येथे होणार आहे. यापूर्वी १९९८ साली पुरुष...

ब्रह्मपुत्रेवर भारताकडून सर्वात लांब पुल बनणार

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये आगामी काही वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपुर्वी चीनकडून ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाची घोरुणार...

उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

उदगीर (बबन कांबळे) : तालुक्यात राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उदगीर शहर हे झपाट्याने शहराच्या चारही बाजूने पसरत आहे. त्याच मानाने शहरात बांधकामांचीही...

निखळ स्पर्धा की निव्वळ हठयोग?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौ-याने ऐन कोरोना संकटाच्या काळात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचे...

बिळे बुजणार कधी?

देशाच्या बँकिंग व्यवस्थेला अक्षरश: गंज लागलेला असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे होत असलेले प्रचंड नुकसान लपून न राहता स्पष्ट दिसणारे आहे. या नुकसानीमुळे होणारा अनर्थ भोगावा...

भारत बनणार ‘जगाची फार्मसी’

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात पारंपरिक औषधांसाठी एक जागतिक केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे आभार...

आणखीन बातम्या

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील...

ब्रह्मपुत्रेवर भारताकडून सर्वात लांब पुल बनणार

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये आगामी काही वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपुर्वी चीनकडून ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाची घोरुणार...

भांगेला औषध म्हणून मान्यता

व्हिएन्ना : भांग ही वनस्पती मादक पदार्थ म्हणून कुप्रसिद्ध आहे. मात्र भारतासह अनेक देशात तिचा औषध म्हणून वापर केला जातो. आता भांगेच्या औषधी गुणधर्मांना...

भारताचा चुकीचा नकाशा हटवा

नवी दिल्ली : आपल्या मंचावरून जम्मू काश्मीरचा चुकीचा नकाशा हटवण्याचे आदेश ‘विकिपीडिया’ला भारत सरकारकडून देण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा...

देशातील १० सर्वाेत्कृष्ठ पोलिस ठाण्यांची यादी जाहीर

नवी दिल्ली : देशातील १० सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची यादी गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली़ यात मणिपूर राज्यातल्या नोंग्पोक्सेमाई या पोलिस ठाण्याने...

शेतकरी आंदोलनाला परदेशातील खासदारांचा पाठिंबा

लंडन: भारत सरकारच्या नव्या कृषि कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन तीव्र झाले आहे. आंदोलनाला ब्रिटन, कॅनडासह इतर देशातील खासदारांनीही पाठिंबा दिला आहे. ब्रिटनचे मजूर पक्षाचे खासदार...

८० टक्के प्रवाशी क्षमतेने देशांतर्गत विमान वाहतुकीस परवानगी

नवी दिल्ली : नागरी उड्डण मंत्रालयाने देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रवाशांची क्षमता वाढवून आता ८० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी ही...

सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलें यांना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...