28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयमुघलांनी भारताला आकार दिला, मला त्यांचा अभिमान : अब्दूल खालिफ

मुघलांनी भारताला आकार दिला, मला त्यांचा अभिमान : अब्दूल खालिफ

एकमत ऑनलाईन

बारपेटा : मुगलांनी छोट्या छोट्या राज्यांची निर्मिती करून भारताला हिंदुस्तानचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे मला मुघलांचा अभिमान आहे, असे वादग्रस्त विधान आसाममधील बारपेटा मतदारसंघाचे लोकसभा खासदार अब्दुल खालिक यांनी केले आहे. तथापि, मी मुघल नाही किंवा मी त्याचा वंशज नाही. त्यांनी हिंदुस्थानला एक आकार दिला आहे. मुघलांशिवाय देशाचा स्वातंत्र्यलढा अपूर्ण राहिला असता असेही खालिफ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भारतात लाल किल्ला, ताजमहाल यांसारखी स्मारके बांधली त्यामुळे मुघलांचे देशासाठीचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. देशाचा प्रत्येक पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावतो यावरून मुघलांचे महत्त्व लक्षात येते. मुघलांचा एवढा द्वेष असेल तर, लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणे योग्य होणार नाही, असेही खालिफ यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या