32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयमुकेश अंबानी आशियात पुन्हा अग्रस्थानी

मुकेश अंबानी आशियात पुन्हा अग्रस्थानी

एकमत ऑनलाईन

मुंबई : ब्लूमबर्ग बिलियर्नस इंडेक्सनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. चीनच्या झोँग शनशानने या आठवड्यात २२ अब्ज डॉलर्स गमावल्यामुळे हा बदल झाला. झोंगच्या कंपनीला या आठवड्यात विक्रमी २० टक्के तोटा सहन करावा लागला. मुकेश अंबानी यांची संपत्ती सुमारे ८० अब्ज डॉलर्सची असून झोँगची संपत्ती ७६.६ अब्ज डॉलर्स आहे. झोंग शनशान यापूर्वी जॅक मासारख्या चिनी टेक दिग्गजाला मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला होता.

गेल्या दोन वर्षांपासून मुकेश अंबानी हे आशियामधील सर्वात श्रीमंत लोकांच्या क्रमवारीत आघाडीवर आहेत. परंतु झोँग शशानने आपल्या दोन कंपन्यांमुळे कमावलेल्या फायद्याच्या जोरावर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे पद ग्रहण केले होते. २०२१ च्या सुरुवातीस झोँग शनशान जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती होते. दुसरीकडे मुकेश अंबानी यांनी आणि गूगल फेसबुकसह इतर गुंतवणूकदारांना रिलायंस डिजिटल आणि रिटेल युनिटमधील भागांची विक्री करून आपले भविष्य उंचावले आणि आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

नोव्हेंबर २०२० मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (आरआयएल) शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन झाल्यानंतर मुकेश अंबानी फोर्ब्स रियल टाइम अब्जाधीशांच्या यादीत तीन स्थान घसरले.

 

पत्रकार खाशोगी यांची हत्या राजकुमार सलमान बिन मोहम्मद यांच्या परवानगीनेच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या