26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयमुकुल रोहतगी होणार देशाचे नवे ऍटॉर्नी जनरल

मुकुल रोहतगी होणार देशाचे नवे ऍटॉर्नी जनरल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मुकुल रोहतगी यांची भारताचे ऍटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा दुसरा कार्यकाळ १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. रोहतगी केके वेणुगोपाल यांची जागा घेतील, त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे.

रोहतगी यांची यापूर्वी जून २०१४ मध्ये ऍटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि जून २०१७ पर्यंत ते कार्यरत होते. रोहतगींची ही नियुक्ती दुस-यांदा होत आहे. विद्यमान ऍटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांची सेवा ३० जून रोजी संपणार होती. मात्र, त्यांची सेवा वाढवण्यात आली. मुकुल रोहतगी १ ऑक्टोबर २०२२ पासून ऍटॉर्नी जनरल म्हणून त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू करतील. रोहतगींची जून २०१४ मध्ये ऍटॉर्नी जनरल म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. पहिल्या टर्ममध्ये रोहतगी जून २०१७ पर्यंत कार्यरत होते. वेणुगोपाल यांनी नुकतेच सुप्रीम कोर्टात ३० सप्टेंबरनंतर पदावर राहणार नसल्याचे संकेत दिले होते. वेणुगोपाल यांचा कार्यकाळ या वर्षी जून अखेरीस तीन महिन्यांनी वाढवण्यात आला. मुदतवाढ मिळाल्यानंतर, त्यांचा ऍटॉर्नी जनरल म्हणून कार्यकाळ ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपणार आहे.

वेणुगोपाल यांनी सांभाळला पदभार
वेणुगोपाल यांनी १ जुलै २०१७ रोजी मुकुल रोहतगी यांच्या जागी केंद्र सरकारचे सर्वोच्च कायदेशीर अधिकारी म्हणून प्रथम ऍटॉर्नी जनरल म्हणून पदभार स्वीकारला. सेवा संपल्यानंतर त्यांना ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या