21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयमुस्लीम समुदायातील एकाहून अधिक लग्नाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मुस्लीम समुदायातील एकाहून अधिक लग्नाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मुस्लीम समुदायातील बहुपत्नीत्व या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याबाबत वकील विष्णू शंकर जैन यांनी एक याचिका दाखल केली आहे. त्याअंतर्गत त्यांनी एकाहून अधिक विवाह करण्याच्या प्रथेचा विरोध केला आहे. ते म्हणतात, वैयक्तिक कायद्याच्या आधारावर आयपीसी कलम ४९४ अंतर्गत एकाहून अधिक विवाह करणे दंडनीय आहेत.

त्यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार हिंदू, ख्रिश्चन आणि पारसी कायद्यानुसार ही प्रथा रोखण्यात आली आहे. मात्र मुस्लीम पर्सनल लॉ (शरीयत) अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅक्ट १९३७ च्या सेक्शन २ नुसार याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय यात नमूद करण्यात आले आहे की, संविधानाच्या अनुच्छेद – १४ नुसार हा भेदभाव आहे आणि सार्वजनिक धोरण, सभ्यता आणि नैतिकतेच्या विरोधात आहे.

ही याचिका हिमाचल प्रदेशातील कशिका शर्मा, बिहारमधील उषा सिन्हा, उत्तर प्रदेशातील किरण सिंह, सुवीद प्रवीण कंचन आणि पारुल खेडा, लखनौ स्थित जन उदयोष संघटनेने दाखल केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या