नवी दिल्ली : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांची प्रकृती गंभीर आहे. पुढील ७२ तास त्यांच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांची मुलगी सुमैया राणा यांनी मुनव्वर राणा यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.
पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेल्या मंगळवारी त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला. सुमैया यांच्या माहितीनुसार त्यांना अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.