23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयहिंदू मुलाची हत्या; तिघांना अटक

हिंदू मुलाची हत्या; तिघांना अटक

एकमत ऑनलाईन

कलुबुर्गी : एक २५ वर्षीय हिंदू दलित तरुण मुस्लिम तरुणीच्या प्रेमात पडला. त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे त्याची हत्या करण्यात आली. हत्येप्रकरणी मुलीच्या भावासह दोघांना अटक केली आहे. ही घटना कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात घडली. विजय कांबळे असे मृत तरुणाचे नाव आहे. तर शहाबुद्दीन (१९), मुलीचा भाऊ आणि नवाज (१९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

विजयला हल्लेखोरांनी घेरले होते. त्यांच्यामध्ये वादावादी झाली. हाणामारीत हल्लेखोरांनी विजयला रक्तबंबाळ केले. काही वेळाने विजयचा मृत्यू झाला. विजय मुस्लिम तरुणीवर प्रेम करीत होता. त्याला तिच्यासोबत लग्नही करायचे होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा प्रेमाला विरोध होता, असे या प्रकरणाचा तपास करणा-या पोलिस अधिका-यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या