16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeक्राइमप्रियकरासाठी पतीचा खून

प्रियकरासाठी पतीचा खून

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : प्रियकराशी लग्न करण्यासाठी बायकोने आपल्याच नव-याची निर्दयी हत्या केल्याचा प्रकार बंगळुरुमध्ये घडला. येलहंका येथील कोंडाप्पा ले-आऊटमधील इमारतीच्या छतावर पतीचा नग्न मृतदेह पोलिसांना सापडला.

श्वेता असे या क्रूर पत्नीचे नाव असून प्रियकर सुरेशच्या मदतीने तीने नवरा चंद्रशेखर चा काटा काढला. चंद्रशेखर हा विणकर होता.

श्वेताने सुरुवातीला लोकेशने हा खून केल्याचा संशय व्यक्त केला होता. डिसेंबरमध्ये श्वेताने लोकेशविरुद्ध पोलिसांत तक्रारही केली होती. तिच्या बयाणावर पोलिसांना संशय आला. त्यावरून पोलिसांनी मोबाईल तपासला असता नव-याच्या हत्येत तिचाच सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या