27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयसोनाली फोगाट यांची हत्या?

सोनाली फोगाट यांची हत्या?

एकमत ऑनलाईन

पणजी : भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर त्यांच्या गूढ मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे तर मोठे षडयंत्र रचून झाल्याचा आरोप त्यांचे भाऊ रिंकू ढाका यांनी केला आहे. दरम्यान, त्यांच्या मृत्यूनंतर आणखी एक नवी गोष्ट समोर आली आहे. सोनालीसोबत वर्षानुवर्षे बलात्काराच्या कट, ब्लॅकमेलिंग आणि स्लो पॉयझनिंगचा प्रकार सुरू होता. अशी माहिती मिळाली आहे.

सोनालीचा लहान भाऊ रिंकू ढाका हे हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील भूथनकला गावात राहतात. त्यांनी आपल्या बहिणीचा पीए सुधीर संगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांच्यावर सोनालीला तिच्या जेवणात मादक पदार्थ देऊन बलात्कार केल्याचा आणि व्हीडीओ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. तसेच, मी गोव्यात येऊन चौकशी केली असता इथे कोणतीही शूटिंग सुरु नसल्याचे कळले. सोनालीला चंदिगडमध्येच थांबायचे होते, पण सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी मिळून माझ्या बहिणीचा खून केला. तिची संपत्ती हडपण्यासाठी तसंच राजकीय षड्यंत्राच्या हेतूने तिचा खून केला. सुधीर सांगवान आणि सुखविंदर आदींविरोधात कायदेशीर कारवाई केली जावी असे सोनाली यांच्या भावाने म्हटले आहे. यासंदर्भात रिंकूने गोवा पोलिसांकडे लेखी तक्रारदेखील दिली आहे.

शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती
४२ वर्षीय सोनाली यांच्या शरीरावर अनेक बोथट हत्यारांच्या जखमा असल्याचा उल्लेख आहे. मृत्यूच्या काही वेळापूर्वी सोनाली यांनी आई, बहीण आणि मेहुण्याशी संवाद साधला होता. त्यावेळी त्या अस्वस्थ होत्या आणि त्यांनी दोघा सहका-यांविरूध्द तक्रार केली होती असा दावा रिंकूढाकाने केला. हरियाणातील सोनाली यांच्या फार्महाऊसमधील सीसीटीव्ही कॅमेरे, लॅपटॉप आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या मृत्यूनंतर गायब झाल्याचा दावाही ढाकाने केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या