22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयटीआरएस नेत्याची हत्या

टीआरएस नेत्याची हत्या

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील एका गावात राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर काही वेळातच सोमवारी टीआरएस नेते तम्मिनेनी कृष्णैय्या यांची चार अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. या घटनेनंतर परिसरात वाढता तणाव पाहून पोलिसांनी कलम १४४ लागू केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा राष्ट्रीय समितीचे नेते तम्मिनेनी कृष्णैया यांच्यावर खम्मम ग्रामीण मंडळाच्या तेलदारुपल्ली गावात चार अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांची हत्या केली. सोमवारी सकाळी राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभातून टीआरएस नेते परतत असताना ही घटना घडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या