नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणारा शार्प शूटर प्रियवर्त फौजी, कशिश उर्फ कुलदीप आणि त्याचा साथीदार केशव यांच्यासह ४ आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.
पहाटे ४ वाजता पोलिसांनी त्यांना मानसा येथे आणले होते. रिमांडनंतर त्यांना बंदोबस्तात खरड येथे आणले. मुसेवाला खून प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणारा लॉरेन्स टोळीचा प्रमुख व इतरांची अजून चौकशी सुरू आहे.