23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeराष्ट्रीयसंगीतकार वनराज भाटिया यांचे निधन

संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. ते प्रदीर्घ आजाराने त्रस्त होते. मुंबईतील राहत्या घरी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वनराज भाटिया यांच्या निधनामुळे बॉलिवूडसोबत संगीतसृष्टीत शोककळा पसरली आहे. भाटिया यांनी अनेक बॉलिवूडपटांना संगीत दिले. त्यात जाने भी दो यारों, तरंग, द्रोह काल, अजूबा, बेटा, परदेस, चमेली और रूल्स : प्यार का सुपरहिट फॉर्म्युला, खानदान आदी चित्रपटांचा समावेश आहे.

१९८८ साली गोविंद निहलानी यांच्या तमस चित्रपटातील संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. शिवाय २०१२ मध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले होते. ३१ मे १९२७ रोजी जन्मलेल्या वनराज भाटिया यांनी रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ म्युझिकमधून संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर १९५९ मध्ये ते भारतात परतले आणि त्यांनी जाहिरातींसाठी जिंगल बनवण्याचे काम सुरु केले. त्यांनी ७००० पेक्षा जास्त जाहिरातींसाठी जिंगल दिले. तसेच त्यांच्या संगीताने बॉलिवूड क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली.

थोर संगीतकाराला मुकलो : अमित देशमुख
चित्रपट, मालिका आणि जाहिराती या तिन्ही क्षेत्रांत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीत दिग्दर्शनाची छाप सोडलेल्या ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया यांच्या निधनामुळे भारतीय संगीताशी घट्ट नाळ असलेला पाश्चात्य संगीताचा जाणकार संगीतकार हरपला, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० कोटीचे हेरॉईन जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या