25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीय‘सीएसआयआर’च्या प्रमुखपदी महिला, नल्लाथंबी कलैसेल्वी

‘सीएसआयआर’च्या प्रमुखपदी महिला, नल्लाथंबी कलैसेल्वी

एकमत ऑनलाईन

गेल्या काही वर्षात अवकाश, तंत्रज्ञान, विज्ञान अशा सगळ्या विषयात महिलाही आपले स्थान निर्माण करत असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे नल्लाथंबी कलैसेल्वी यांची वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (उरकफ) पहिल्या महिला महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे.

नल्लाथंबी कलैसेल्वी या फेब्रुवारी २०१९ पासून तामिळनाडूच्या कराईकुडी येथील केंद्रीय इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांची ‘सीएसआयआर’च्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे.

‘सीएसआयआर’ हे देशभरातील ३८ संशोधन संस्थांचे संघटन असून १९४२ मध्ये या संस्थेची स्थापना झाली आहे. कलैसेल्वी यांचा ‘सीएसआयआर’ मध्ये नवोदित शास्त्रज्ञ ते महासंचालक असा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. महासंचालक पदाची नियुक्ती २ वर्षांसाठी करण्यात आली असून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या सचिवपदीही नियुक्ती करण्यात आली आहे.

याआधी संस्थेच्या महासंचालकपदी शेखर मांडे कार्यरत होते. मांडे एप्रिलमध्ये निवृत्त झाल्यावर जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश गोखले यांच्याकडे ‘सीएसआयआर’चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. अखेर या पदावर कलैसेल्वी यांची नियुक्ती करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या