28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीय१७ सप्टेंबरला मुक्ती दिनऐवजी राष्ट्रीय एकता दिवस नाव द्या : ओवेसी

१७ सप्टेंबरला मुक्ती दिनऐवजी राष्ट्रीय एकता दिवस नाव द्या : ओवेसी

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी दावा केला की त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून ‘हैदराबाद मुक्ती दिन’ ऐवजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून १७ सप्टेंबर हा दिवस साजरा करण्याची मागणी केली.

केंद्र सरकारने १७ सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती दिन म्हणून घोषित केल्यानंतर काही तासांतच ओवेसी यांनी हा दावा केला. ब्रिटिश शासकांविरुद्ध लढलेले क्रांतिकारक तुर्रेबाज खान आणि मौलवी अलाउद्दीन यांच्या बलिदानाचे स्मरण करून ओवेसी म्हणाले की, हैदराबाद संस्थानात राहणाऱ्या सामान्य हिंदू आणि मुस्लिमांनी लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि प्रजासत्ताक भारताचा पुरस्कार केला होता.

ओवेसी पुढं म्हणाले की, विविध संस्थानांचे विलीनीकरण हे केवळ प्रांतांना निरंकुश राज्यकर्त्यांपासून मुक्त करण्यासाठी नव्हते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी चळवळीने या प्रदेशांतील लोकांना स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग म्हणून पाहिले. त्यामुळे केवळ मुक्ती हा शब्द वापरण्याऐवजी राष्ट्रीय एकात्मता दिन अधिक योग्य ठरेल. केवळ जमिनीचा तुकडा ‘मुक्त करणे’ म्हणून याकडे पाहिले जाऊ नये, असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या