22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयनरेंद्र मोदी जगात लोकप्रिय नेते

नरेंद्र मोदी जगात लोकप्रिय नेते

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भारतातच लोकप्रिय नसून जगभरात सर्वात लोकप्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. नरेंद्र मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत जगभरातल्या नेत्यांना मागे टाकले आहे. ग्लोबल रेटिंगमध्ये ७५ टक्के पसंती मिळवून त्यांनी यात सर्वात वरचा क्रमांक पटकावला आहे. मॉर्निंग कन्सल्ट संस्थेने केलेल्या एका सर्व्हेमधून ही गोष्ट समोर आली. या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन ४१ टक्के पसंतीसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत ७५ टक्के पसंतीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर मेक्सिकोच्या पंतप्रधान अन्ड्रेस मॅन्यूएल लोपेज ओब्राडॉर यांचा क्रमांक लागत असून तिस-या क्रमांकावर इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी आहेत. मॉर्निंग कन्सल्टने या जगभरातल्या २२ नेत्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. ब्राझिलचे अध्यक्ष बोल्सोनारो हे ४२ टक्के पसंतीसह चौथ्या क्रमांकावर आहेत. जो बायडेन यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो ३९ टक्के पसंतीसह सहाव्या क्रमांकावर तर जपानचे पंतप्रधान फुमीओ किशिदा ३८ टक्के पसंतीसह सातव्या क्रमांकावर आहेत. या आधीही जानेवारी २०२२ आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या