23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयराष्ट्रीय तपास संस्थेचे जम्मू-काश्­मीरमध्ये छापे

राष्ट्रीय तपास संस्थेचे जम्मू-काश्­मीरमध्ये छापे

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज बंदी घालण्यात आलेल्या ‘जमाते इस्लामी’ या दहशतवादी संघटनेच्या जम्मू-काश्­मीरमधील विविध ठिकाणांवर छापे घातले. तसेच, या संघटनेच्या म्होरक्यांच्या आणि सदस्यांच्या घरीही छापे टाकण्यात आले. ‘एनआयए’ने या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करणा-या सभासदांविरोधात शोधमोहीम देखील हाती घेतली आहे.

जमाते इस्लामी या संघटनेचे सदस्य जम्मू-काश्­मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवित असल्याची माहिती ‘एनआयए’ला मिळाली होती. त्या आधारावर ही कारवाई करण्यात आल्याचे सरकारी अधिका-यांनी सांगितले. जम्मूमधील दोडा आणि भटिंडी या जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या