27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयदेशातील ४६ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

देशातील ४६ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आज देशभरात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने आज राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील ४६ शिक्षकांना सर्वोत्कृष्ठ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी देशातील सर्वश्रेष्ठ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यामध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

आज देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे. देशातील ४६ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये काम करणा-या गुणवंत शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. या वर्षी पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांची तीन टप्प्यातील ऑनलाइन प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली आहे. विजेते शिक्षक हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र आणि तेलंगणातील इतर प्रदेशातील आहेत.

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली, त्याचबरोबर शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्रातील तीन शिक्षक
१) कविता संघवी, प्राचार्य, चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूल, मुंबई, महाराष्ट्र
२) शशिकांत संभाजीराव कुलथे, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामुनैकतांडा ताकगेवराई, बीड, महाराष्ट्र
३) सोमनाथ वामन वाळके, शिक्षक, जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी, बीड, महाराष्ट्र.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या