21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीययूपीत राष्ट्रवादी-समाजवादीची आघाडी?

यूपीत राष्ट्रवादी-समाजवादीची आघाडी?

एकमत ऑनलाईन

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी असलेल्या भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार रणनीती आखण्यात येत आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला असून, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी समाजवादी पार्टीसोबत आघाडी करून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

एनसीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस के.के. शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात आमचा पक्ष निवडणूक लढवणार आहे. ही लढाई अनेक मुद्यांवरून लढवली जाईल. महाराष्ट्राप्रमाणेच इथेही आम्ही विरोधी पक्षांसोबत आघाडी करू आणि समाजवादी पक्षासोबत मिळून निवडणूक लढवू आणि भाजपाला पराभूत करू. केके शर्मा यांनी सांगितले की, जे पक्ष समान विचारसरणीचे आहेत, त्यांच्यासोबत आम्ही आघाडी करू. सध्यातरी जागावाटपाबाबत काही चर्चा झालेली नाही. मात्र शरद पवार आणि अखिलेश यादव यांच्यांमध्ये फोनवर चर्चा झाली आहे.

योगी सरकार लोकशाहीसाठी धोकादायक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते के. के. शर्मा म्हणाले की, उत्तर प्रदेशमधील योगी सरकार लोकशाहीसाठी धोका आहे. यांच्याविरोधात जो कुणी आवाज उठवत आहे, त्याचा आवाज दाबला जात आहे. राज्यामध्ये सुरू असलेल्या धर्मपरिवर्तनाच्या वादावर जर कुणी आपल्या इच्छेने धर्म बदलत असेल तर त्यामध्ये काही चुकीचे नाही. मात्र आम्ही जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्याच्या विरोधात आहोत.

मीराबाई चानू बनणार आता अतिरिक्त पोलिस अधीक्षक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या