34.2 C
Latur
Thursday, June 1, 2023
Homeराष्ट्रीय‘निसर्गा’मुळे गुजरात किनारपट्टीवर धोका

‘निसर्गा’मुळे गुजरात किनारपट्टीवर धोका

- २० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यास प्रारंभ

एकमत ऑनलाईन

सुरत: वृत्तसंस्था
‘निसर्गा’ चक्रीवादळ आता गुजरातकडे येत असून, वलसाड व नवसारी जिल्हा प्रशासनाने किनारी प्रदेशातील ४७ खेड्यात राहणाºया २० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे वादळ गुजरात किना-यावर भूस्पर्श करणार नाही. पण त्या वादळामुळे किनारी भागात मोठयÞा प्रमाणात पावसाची शक्यता आहे, असे हवामान केंद्राचे संचालक जयंत सरकार यांनी म्हटले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वलसाड व नवसारी येथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असून दोन जिल्ह्यातीतील वीस हजार लोकांना हलवण्यात येत आहे.

Read More  ‘भूल भुलैया 2′ लॉकडाऊनमुळे हा चित्रपट लांबणीवर पडला; 31 जुलैला होणार प्रदर्शित

वलसाडचे जिल्हाधिकारी आर.आर. रावळ यांनी सांगितले की, आम्ही जिल्ह्यÞातील पस्तीस खेड्यातील १० हजार लोकांना हलवण्यासाठी पथके स्थापन केली आहेत. नवसारी जिल्ह्यÞात प्रशासनाने १० हजार २०० लोकांना १२ खेडयÞातून हलवण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे जिल्हाधिकारी आर्द्रा अग्रवाल यांनी सांगितले. हवामान खात्याच्या माहितीनुसार पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असून तो सुरतपासून ६७० कि.मी. अंतरावर आहे. त्याचे सहा तासात चक्रीवादळात रूपांतर होणार असून, त्यानंतर बारा तासात ते गंभीर रूप घेऊन उत्तर महाराष्ट्र , दक्षिण गुजरातमधून प्रवास करील त्याचा प्रवास हरिहरेश्वर ते दमण असा होत असून ३ जूनला ते अलिबागजवळ असेल. त्याचा वेग त्यावेळी ताशी शंभर किमी राहणार आहे.

सध्याच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ अलिबागमध्ये भूस्पर्श करणार असून उत्तर महाराष्ट्र व दक्षिण गुजरात दरम्यान हे ठिकाण आहे. वादळ दक्षिण गुजरातमधून जाणार नसले तरी त्याचा फटका बसून पाऊस होऊ शकतो. राष्ट्रीय आपत्ती दलाची चौदा पथके गुजरातमध्ये तैनात करण्यात आली आहेत. पाच पथके इतर राज्यातून येणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या