32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयअखेर नवदीप कौरला जामिन मंजूर

अखेर नवदीप कौरला जामिन मंजूर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कामगार हक्क कार्यकर्ती नवदीप कौर हिला अखेर शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या १२ जानेवारीपासून ती तुरुंगात बंद होती. हरयाणात मजुरांच्या हक्कांसाठी लढणा-या नवदीपविरुद्ध शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात सहभागी होण्याचा आरोप ठेवला होता. तीन प्रकरणांत जामीन मिळाल्यानंतर शुक्रवारी तिची करनाल तुरुंगातून सुटका करण्यात आली.

तुरुंगातून सुटकेनंतर आपण सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देणार असल्याचे नवदीप कौरने म्हटले आहे.दिल्ली-हरयाणाच्या सीमेवर कुंडलीमध्ये कामगारांच्या एका आंदोलनात सहभागी झालेल्या नवदीप कौर हिला १२ जानेवारी रोजी अटक केली होती. कृषि कायद्यांविरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरु असतानाच हे आंदोलन सुरु होते. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणा-या दलित तरुणी नवदीप कौर हिला प्रशासनाकडून निशाणा बनवण्यात आल्याचा आरोप समर्थकांकडून करण्यात येत आहे.

पोलिसांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप
सुटकेनंतर नवदीप कौरच्या बहिणीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिस स्टेशनमध्ये नवदीपला पुरुष पोलिसांकडूनही मारहाण करण्यात आली तसेच लैंगिक छळ करण्यात आल्याचाही आरोप नवदीपच्या बहिणीकडून करण्यात आला आहे. नवदीपच्या खासगी अंगावर जखमांच्या खुणा आहेत, याविरुद्ध कारवाई केली जावी, अशी मागणी तिच्या बहिणीने केली आहे.

पोलिसांनी फेटाळले आरोप
पोलिसांनी नवदीपच्या बहीणीने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. नवदीप कौरने केलेल्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. यामध्ये एका महिला कॉन्स्टेबलचाही समावेश होता, असे पोलिसांनी म्हटले आहे.

 

पत्रकार खाशोगी यांची हत्या राजकुमार सलमान बिन मोहम्मद यांच्या परवानगीनेच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या