25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयनवोदय परीक्षा दुस-यांदा लांबणीवर

नवोदय परीक्षा दुस-यांदा लांबणीवर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नवोदय विद्यालय समितीने इयत्ता सहावीच्या वर्गासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा दुस-यांदार लांबणीवर टाकली आहे. एनव्हीएसटी प्रवेश परीक्षा मिझोरम, मेघालय आणि नागालँड वगळता इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १६ मे रोजी होणार होती. तर या तीन राज्यांमध्ये १९ जून २०२१ रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

जवाहर नवोदय विद्यालयाची सहावीच्या वर्गाची प्रवेश परीक्षा दुस-यांदा स्थगित केली गेली असून, यापूर्वी परीक्षा १० एप्रिलला होणार होती. त्यानंतर १६ मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने तारीख जाहीर केली जाणार आहे. नवोदय विद्यालय समितीकडून इयत्ता सहावीच्या वर्गासाठी अखिल भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते.

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहावीच्या वर्गासाठी आयोजित करण्यात येणा-या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२१ ची नवीन तारीख जाहीर केली जाईल. परीक्षेची नवीन तारीख जाहीर करताना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी १५ दिवसांची मुदत मिळेल, असा वेळ ठेवून तारीख जाहीर होईल. कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रशासकीय कारणांमुळं परीक्षा लांबणीवर टाकल्याची माहिती, जवाहर नवोदय विद्यालयाशी संबंधित अधिका-यांनी सांगितले आहे़

रेमडेसिवीर स्वस्त – केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या