22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeराष्ट्रीयनवरात्रीच्या मंडपाला आग, ५ जण जळाले

नवरात्रीच्या मंडपाला आग, ५ जण जळाले

एकमत ऑनलाईन

भदोही : उत्तर प्रदेशातील भदोही येथील नवरात्रीच्या मंडपात रविवारी रात्री ८ वाजता ५ जण जिवंत जळाले. यामध्ये ३ मुले आणि २ महिलांचा समावेश आहे. भगवान शंकर-मां काली यांची लीला कलाकार साकारत असताना ही घटना घडली. स्टेजसमोर दीडशेहून अधिक लोक बसले होते. त्यात बहुतांश महिला आणि लहान मुले होती. त्यानंतर अचानक स्टेजच्या उजव्या बाजूला आग लागली.

आरती सुरू असताना ही आग लागली. यामुळे एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. मोठी गर्दी असल्याने लोक बाहेर येण्यापूर्वीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आजूबाजूच्यांनी कसे तरी लोकांना बाहेर काढले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले. यानंतर ही आग संपूर्ण मंडपात पसरली.

घटनेच्या वेळी मंडपात महिला आणि लहान मुले होती. दुर्गापूजेची परवानगी घेण्यात आली. मात्र, अग्निशमन विभागाची गाडी परिसरात उभी नव्हती. त्यामुळे सुरुवातीची २० मिनिटे मंडपावर पाण्याचा फवारा पडला नाही. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. २ तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. यादरम्यान जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मंडपात आग खूप वेगाने पसरली. ज्वाळा वर जात होत्या. लोक स्वत: मदतीला आले. पाणी टाकू लागले. कसे तरी लोक वाचले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या