36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयकेंद्र व राज्यांच्या अर्थसंकल्पात ताळमेळाची गरज

केंद्र व राज्यांच्या अर्थसंकल्पात ताळमेळाची गरज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: देशाच्या समग्र विकासासाठी केंद्र आणि राज्यांच्या अर्थसंकल्पात ताळमेळ असणे गरजेचे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच राज्य आणि केंद्राने आपल्या अर्थसंकल्पाची दिशा एक ठेवावी, अशी सूचनाही त्यांनी राज्यसरकारांना केली आहे. नवी दिल्लीत नीती आयोगाची सहावी बैठक शनिवारी पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विकासाच्या भावी दिशेबाबत सुतोवाच केले. देशाच्या समग्र व गतीमान विकासासाठी केंद्रीय व राज्यांच्या अर्थसंकल्पात एक सुसुत्रता असण्यावर त्यांनी भर दिला. तसेच अर्थसंकल्पात केंद्र सरकारने कंपनी करात घट केल्याचा फायदा राज्यांनी घ्यावा आणि जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करावी, असे आवाहनही केले.व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व केंद्र शासित प्रदेशाचे प्रशासक, नीती आयोगाचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी ब्लू इकॉनॉमीमध्ये (मत्स्य व्यवसाय) भारताला व्यापाराच्या आणि विकासाच्या अपार संधी असल्याचेही सांगितले. ज्या राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे त्या राज्यांनी मत्स्य व्यापाराच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत त्यात निर्यातीच्या अपार संधी उपलब्ध आहेत,असे सांगितले. भारत आता ब्लू इकॉनॉमीमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. मच्छीमारांना अधिकचे भांडवल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उच्च गुणवत्तापूर्वक पायाभूत सुविधांचा विकास करणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारच्या यासंबंधातील योजनांशी ताळमेळ ठेवून राज्यसरकारांनी त्या अधिक प्रभावीपणे राबविल्या तरच या अपार संधींचा त्या राज्यांना लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

तेलबियांचे उत्पादन वाढविण्याचे आवाहन
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भारत कृषिप्रधान देश असला तरी आपण दरवर्षी सुमारे ७० हजार कोटींचे तेल आयात करतो, हे चिंतेचे असल्याचे सांगितले. शेतकºयांनी तेलबियांचे उत्पादन वाढवून हा सर्व पैसा आपल्या पदरात पाडून घ्यावा. आयातीपोटी आपले वाचलेले पैसे आपल्याला अन्य क्षेत्रात गुंतवून त्यांचाही विकास साधता येईल, असे त्यांनी सांगितले.

दोन मुख्यमंत्र्यांचा बहिष्कार
नीती आयोगाच्या या सहाव्या बैठकीवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी बहिष्कार टाकला होता.

इंधन दरवाढीसाठी आधीचे सरकार जबाबदार – अर्थमंत्री सीतारामण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या