36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयबिहारमध्ये नेपाळचे पेट्रोल, डिझेल

बिहारमध्ये नेपाळचे पेट्रोल, डिझेल

एकमत ऑनलाईन

पाटना : बिहारची राजधानी पाटनामध्ये आज पेट्रोलचा दर ९३.०७ रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल ८६.३७ रुपये आहे. तरीही बिहारमध्ये यापेक्षाही स्वस्त पेट्रोल, डिझेल मिळत आहे. हे विदेशी पेट्रोल ८० रुपये आणि डिझेल ७० रुपयांना मिळत आहे. यामध्ये बिहारने गोव्यालाही मागे टाकले आहे.

बिहारला लागूनच नेपाळ आहे. नेपाळला भारतातूनच पेट्रोलचा सप्लाय होतो. भारताच्या तुलनेत नेपाळमध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती या कमी आहेत. या किंमती जवळपास १८ रुपयांनी कमी आहेत. यामुळे बिहार-नेपाळच्या सीमेवर मोठी तस्करी होऊ लागली आहे. या आधी थोड्या प्रमाणावर होत होती. परंतू देशात पेट्रोलचे दर पेटल्याने आता बॉर्डरवरील भागात नेपाळचेच इंधन वापरले जात आहे.

सीमाभागात राहणारे पल्सर, एफझेडवाले नेपाळमध्ये जाऊन दुचाकीची टाकी फुल करून परतत आहेत. तर कारवाले देखील नेपाळमध्ये जाऊन टाकी फूल करून भारतीय हद्दीत येत पेट्रोल, डिझेलची भारतापेक्षा कमी परंतू नेपाळपेक्षा जास्त दराने विक्री करत आहेत. या काळात या रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे.

याआधी तस्करांच्या टोळ्या पेट्रोल, डिझेल कॅनमध्ये भरून आणत होते. मात्र, सीमेवर ही तस्करी पकडण्यात येऊ लागताच आता तस्करांनी वाहनातच इंधन भरून आणण्याचा प्रकार सुरु केला आहे. रिकामी टाकी करून हे तस्कर नेपाळमध्ये पोहोचत आहेत. दुचाकी, चारचाकीवरून दिवसाला १०-१० फे-या होत आहेत. यामुळे नेपाळच्या पेट्रोलपंप चालकांची तसेच सरकारची चांदी झाली आहे. मागणी वाढल्याने नेपाळनेही भारताकडे जादा पेट्रोल, डिझेलची मागणी केली आहे.

नेपाळमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर किती?
नेपाळची औद्योगिक राजधानी असलेल्या बिराटनगरमध्ये डिझेलची किंमत १०० नेपाळी रुपये आणि पेट्रोल ११० नेपाळी रुपयांना विकले जाते. भारतीय रुपयात हे पेट्रोल ६८.७५ आणि डिझेल ६२.५० रुपये आहे. भारतीय बाजारात बिहारमध्ये जवलपास १० ते २० रुपयांचा फरक आहे. यामुळे बिहारच्या बेरोजगारांना या दिवसात मोठा रोजगार मिळाला आहे. गोव्यात पेट्रोलची किंमत ८७.८८ रुपये आणि डिझेल ८५.०६ रुपयांना मिळतेय. तर बिहारमध्ये या नेपाळी इंधनाचा दर यापेक्षाही कमी आहे.

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवे; दिशाच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या