25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय जम्मू-काश्मीर चीनचा भाग दाखल्याने नेटकरी संतप्त

जम्मू-काश्मीर चीनचा भाग दाखल्याने नेटकरी संतप्त

ट्विटरच्या अधिका-यांना अटक करण्याची केली मागणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ट्विटरवर जम्मू-काश्मीरचा प्रदेश हा भारतीय नकाशाऐवजी चीनच्या नकाशात दाखवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देशातील नामवंत विचारवंतांच्या संस्थांपैकी एक असणाºया ‘आॅब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’ (ओआरएफ) या थ्ािंक टँकच्या एका सदस्याने ही गोष्ट ट्विटर इंडियाच्या लक्षात आणून दिली आहे.

ओआरएफचे सदस्य असणाºया कांचन गुप्ता यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ट्विटरवरील एका लाइव्ह व्हिडीओच्या नोटीफिकेशनचा स्क्रीनशॉट गुप्ता यांनी शेअर केला आहे. त्यामध्ये जम्मू-काश्मीर हा पिपल्स रिपब्लिक आॅफ चायनाचा भाग असल्याचे दाखविले आहे. ‘‘ट्विटरने भूगोल बदलून जम्मू-काश्मीरला पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा भाग घोषित केले आहे. याला भारतीय कायद्याचे उल्लंघन नाही तर काय म्हणायचे? यासाठी भारतीयांना अनेकदा शिक्षा झाली आहे. मात्र अमेरिकेतील मोठ्या कंपन्या आपल्या कायद्याहून मोठ्या आहेत का?,’असे ट्विट गुप्ता यांनी केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी भारताचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनाही टॅग केलं आहे.

त्यानंतर अन्य एका ट्विटमध्ये लेह सुद्धा चीनचा भाग असल्याचे ट्विटरकडून दाखवण्यात येत असल्याचे गुप्ता यांनी निदर्शनास आणून दिले आहे.गुप्ता यांचे हे ट्विट व्हायरल झाले असून हजारो लोकांनी ते रिट्विट केले आहे. अनेकांनी केंद्र सरकारने यासंदर्भात कठोर निर्णय घेत दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.

‘ट्विटर आणि ट्विटर इंडिया तुमच्या म्हणण्यानुसार लेह चीनचा भाग आहे,’असे एका नेटकºयाने विचारले आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करा. सोशल मिडिया कंपन्यांना त्यांच्या मुर्खपणासाठी जबाबदार धरण्यास आणि कारवाई करण्यास मागे पुढे पाहता कामा नये,’असे अन्य एकाने म्हटले आहे. ‘‘ ट्विटर इंडियाविरोधात कारवाई करा. भारताच्या एकात्मतेला ते अशाप्रकारे गृहित धरु शकत नाही. अशाप्रकारेचं वागणे सवयीचा भाग होण्याआधी त्यावर कारवाई करा,’ असे एका व्यक्तीने म्हटले आहे. गजर पडल्यास कायद्याचे उल्लंघन करणाºया कंपनीच्या अधिकाºयांनाही अटक करावी असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे.

ट्विटरचे स्पष्टीकरण
रविवारी सोशल नेटवर्किंगवर या प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर सोमवारी ट्विटरने यासंदर्भातील स्पष्टीकरण जारी केले आहे. यामध्ये त्यांनी जम्मू-काश्मीर चीनचा भाग दाखवणे ही तांत्रिक चूक असल्याचे म्हटले आहे. तसेच आम्ही भारताच्या सर्वभौमत्वाचा आदार करत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या