भुवनेश्वर : ओडिशातील मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाचा रविवारी दुपारी शपथविधी झाला. त्यात २१ मंत्र्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. २१ पैकी १० नवे चेहरे आहेत.
मागील कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री असलेल्या जगन्नाथ सरकार यांना कॅबिनेटपदी बढती मिळाली. ओडिशात मार्च २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. तत्पूर्वी पटनायक यांनी आपले अर्धे मंत्रिमंडळ बदलले. नव्या कॅबिनेटमध्ये महिलांना प्राधान्य दिले.