23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयकर्नाटकात नवा मुख्यमंत्री २८ जुलैला?

कर्नाटकात नवा मुख्यमंत्री २८ जुलैला?

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : कर्नाटकात भाजपमधील अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांना पदावरुन हटवले जावे, अशी पक्षातूनच मागणी आता जोर धरु लागली. याच पार्श्वभूमीवर येदियुरप्पा यांची या महिन्याच्या अखेरीस उचलबांगडी करण्यात येईल, अशी भविष्यवाणीच भाजप प्रदेशाध्यक्षांच्या एका आॅडिओ क्लिपव्दारे व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल यांची ४७ सेंकदांची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्याने कर्नाटकात येदियुरप्पांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.

कर्नाटक राज्याचे भाजपप्रमुख कटिल यांनी राज्यातील संभाव्य नेतृत्व बदलण्याचा इशारा दिल्याने कर्नाटकातील भाजप सरकार अस्थिर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या विधानावर माहिती देताना भाजपचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यत्नाळ यांनी (सोमवारी) सांगितले, की केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. लवकरच यावर तोडगा निघणार असून राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. तो प्रामाणिक, हिंदुत्ववादी आणि भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्यास सक्षम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अपात्र शेतक-यांच्या खात्यातून वसूल करणार किसान योजनेचे पैसे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या