37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयदेशात धान्योत्पादनाचा नवा उच्चांक

देशात धान्योत्पादनाचा नवा उच्चांक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात यंदा अर्थव्यवस्थेला कृषि क्षेत्रानेच तारल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यंदा (२०२०-२१) देशात अन्नधान्योत्पादनात गतवर्षीपेक्षा २ टक्के वाढ होत ते ३०३.३४ दशलक्ष टनांवर गेले आहे. गतवर्षी ते २९७.६ दशलक्ष टन इतकेच होते, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे. यंदा तांदूळ, गहू, डाळी आणि इतर धान्य यांच्या उत्पादनात गतवर्षीपेक्षा मोठी वाढ आहे. शेतकरी आणि वैज्ञानिकांच्या परिश्रमांनी हे शक्य झाले आहे. केंद्र सरकारनेही अनेक चांगल्या योजना राबवून यासाठी पुढाकार घेतला, असेही तोमर यांनी सांगितले.

आकडेवारीनुसार २०२०-२१ मध्ये तांदळाचे उत्पादन १२०.३२ दशलक्ष टन एवढे आहे. गेल्या वर्षी ते ११८.८७ दशलक्ष टन होते. गव्हाचे उत्पादन १०९.२४ दशलक्ष टन (२०१९-२० मध्ये १०८.८६ दशलक्ष टन) गेल्या वर्षीच्या तुलनेत भरड धान्याचे उत्पादन यंदा ४७.७५ दशलक्ष टनांवरून ४९.३६ दशलक्ष टनांवर पोचले आहे. २०१९-२० मध्ये डाळीचे उत्पादन २३.०३ दशलक्ष टन होते. यंदाचा अंदाज २४.४२ दशलक्ष टन आहे.

तेलबियांच्या उत्पादनात विक्रमी वाढ
तेलबियाचे उत्पादन अंदाजे ३७.३१ दशलक्ष टन एवढे आहे. गतवर्षी ते ३३.२२ दशलक्ष टन होते. गेल्या वर्षी ३७०.५० दशलक्ष टन ऊस उत्पादन होते . यंदा ते वाढून ३९७.६६ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. कापसाचे उत्पादनही ३६.०७ दशलक्ष गाठींवरुन वाढून ३६.५४ दशलक्ष गाठींवर जाण्याची शक्यताही तोमर यांनी व्यक्त केली.

अटी मान्य करा, अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या