23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयदेशात लसीकरणाचा नवा उच्चांक

देशात लसीकरणाचा नवा उच्चांक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत कोरोना लसीचे ७५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. या वर्षी जानेवारी महिन्यात लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरू झाल्यापासून भारतात ७५ कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत. जर याच वेगात लसीकरण सुरू राहिले तर डिसेंबरपर्यंत देशातील ४३ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण होईल. तसेच कोरोना साथीची तिसरी लाट रोखण्यासाठी भारताला वर्षाच्या अखेरीस ६० टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस द्यायचे आहेत.

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात देशाने ७५ कोटी लसीकरणाचा आकडा पार केला आहे, असे म्हटले. विक्रमी लसीकरणामुळे जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे अभिनंदन केले आहे. कोरोना लसीकरण वेगात करत असल्यामुळे त्यांनी कौतूक केले. डब्ल्यूएचओ दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितले की, डब्ल्यूएचओने अभूतपूर्व वेगाने कोरोना लसीकरण केल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. पहिले १०० दशलक्ष डोस वितरीत करण्यासाठी भारताला ८५ दिवस लागले. दरम्यान, भारताने केवळ १३ दिवसांत ६५० दशलक्ष कोरोना डोसपासून ७५० दशलक्ष कोरोना डोस देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ही एक मोठी उपलब्धी आहे. सर्वांना मोफत लस पुरवल्याबद्दल मी जनता, कोरोना योद्धा, राज्य सरकार आणि पंतप्रधान यांचे आभार व्यक्त करतो. लसीकरणाच्या बाबतीत भारताने अनेक देशांना मागे सोडले आहे.

४२ टक्के लोकांना पहिला डोस
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात देशाने ७५ कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत देशातील ४२ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येला पहिला डोस मिळाला आहे, तर १३ टक्क्यांपेक्षा जास्त दोन्ही डोस दिले गेले आहेत. भारताने केवळ १३ दिवसांत ६५ कोटींपासून ७५ कोटींचा टप्पा गाठला आहे. म्हणजेच भारताने गेल्या १३ दिवसांत १० कोटी डोस दिले आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या