30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयफाटलेल्या नोटांबाबत आरबीआयकडून नव्या सूचना

फाटलेल्या नोटांबाबत आरबीआयकडून नव्या सूचना

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आपल्याकडे असलेल्या फाटक्या नोटांमुळे बरेचदा आपण अडचणीत सापडत असतो़ तसेच, अशाप्रसंगी दुसरा पर्यायही आपल्याकडे उपलब्ध नसतो़ दरम्यान अशाप्रकारच्या फाटक्या नोटा आपल्याजवळ ठेवाव्या लागतात़ कालांतराने त्याचे विघटन होते आणि नुकसानही होते़ आता मात्र आरबीआय आपल्याकडे असणा-या फाटक्या नोटा बदलून देण्याकरीता नव्या सूचना जारी केल्या असून, कोणत्याही शुल्काशिवाय कोणत्याही बँकेतून नोटा बदलून मिळणार आहेत.

जर तुमच्याकडे फाटलेल्या नोटा असतील आणि त्या दुकानदारही घेत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. आता अगदी सहजपणे या फाटलेल्या नोटा बदलता येणार आहेत. रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया (आरबीआय) कडून फाटलेल्या-जुन्या नोटांबाबत गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ग्राहक बँकेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकतात.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, प्रत्येक बँकेला जुन्या, फाटलेल्या नोटा ग्राहकांकडून स्वीकाराव्या लागतील. यात केवळ एकच अट आहे, या नोटा नकली नसाव्यात. फाटलेल्या नोटा बँक ब्राँचमध्ये जाऊन बदलण्यासाठी कोणताही चार्ज किंवा शुल्क आकारले जाणार नाही. त्याशिवाय, नोटा बदलण्यासाठी त्या बँकेचे ग्राहक असणेही आवश्यक नाही.

नोटेची स्थिती
नोट बदलून द्यायची की नाही, हे बँकेकडून ठरवले जाते. त्यासाठी ग्राहक बँकेला जबरदस्ती करू शकत नाही. बँकेत नोट दिल्यानंतर, बँक नोट मुद्दाम, जाणून-बुजून फाडलेली नाही ना? हे चेक करते. त्याशिवाय नोटची कंडिशन कशी आहे, हेदेखील बँक तपासते. त्यानंतरच नोट बदलून दिली जाते. फाटलेल्या नोटा बँकेत बदलण्याऐवजी खात्यात जमाही केल्या जाऊ शकतात.

कोणत्या नोटा बदलल्या जात नाही
काही स्थितीत नोट बदलून दिली जात नाही. भारतीय रिझर्व्ह बँकच्या नियमांनुसार, अतिशय खराबप्रकारे जळलेल्या, तुकडे-तुकडे झालेल्या स्थितीतील नोटा बदलल्या जात नाहीत. अशाप्रकारच्या नोटा आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्येच जमा केल्या जाऊ शकतात.

या नोटांचा वापर बंद
ज्या नोटांवर कोणताही संदेश लिहिलेला असेल किंवा राजकीय संदेश असल्यास, त्या नोटांचा वापर केला जाऊ शकत नाही.

कमी क्षेत्रात उसाचे अधिक उत्पन्न घेणे काळाची गरज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या