30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयकोरोना योध्दांसाठी लवकरच नवे विमा कवच

कोरोना योध्दांसाठी लवकरच नवे विमा कवच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गतवर्षी कोरोना प्रादुर्भाव वाढण्यास प्रारंभ झाल्यानंतर केंद्र सरकारने कोरोनाशी दोन हात करणा-या सर्व प्रकारच्या योध्दांना कोरोनाचे विमा कवच उपलब्ध करून दिले होते़ त्या कोरोना कवच विम्याचा कालावधी मार्च महिन्यात संपल्याने आता ती योजना रद्द करण्यात आली असून, देशातील सर्व फ्रंटलाईन योध्दांना नवे विमा कवच लवकरच उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सोमवार दि़ १९ एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे़

कोरोना महामारीच्या काळात जीव गमावलेल्या आरोग्य कर्मचा-यांसाठी एक योजना सुरु करण्यात आली होती. याअंतर्गत आरोग्य कर्मचा-यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळायचा. ही योजना बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आरोग्य मंत्रालयातील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या विमा कंपनीसोबत सरकार सध्या चर्चा करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना मागील महिन्यात दिलेल्या सर्क्युलरनुसार योजना २४ मार्च रोजी संपली आहे. कोरोना कर्मचा-यांच्या मृत्यूची नुकसानभरपाई म्हणून केंद्र सरकारने मागीलवर्षी १.७ लाख कोटी रुपयांच्या कोविड रिलिफ पॅकेजची घोषणा केली होती. जवळपास २२ लाख आरोग्य कर्मचा-यांना याअंतर्गत विमा पुरवण्यात आला होता.

वॉर्ड बॉय, नर्स, आशा वर्कर्स, पॅरामेडिक्स, डॉक्टर्स यांना आरोग्य कर्मचा-यांच्या विम्यामध्ये समावेश करुन घेण्यात आला होता. खासगी क्षेत्रातील कर्मचा-यांनाही ही सुविधा देण्यात आली होती. भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मार्चपर्यंत करण्यात आलेले सर्व दावे या योजनेसाठी पात्र असतील. तसेच यासंदर्भातील कागदपत्रे जमा करण्यासाठी एक महिन्यांचा वाढीव वेळ देण्यात येईल. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी २६ मार्च २०२० मध्ये जाहीर केले होते की, ही योजना ९० दिवसांसाठी असेल, पण नंतर या योजनेचा कालावधी एक वर्षासाठी वाढवण्यात आला होता.

जुनी विमा योजना रद्द
एकीकडे देशात कोरोनाच्या दुस-या लाटेचा धुमाकूळ सुरू आहे. तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने कोरोना वॉरियर्ससाठीची विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य सचिवांनी हे पत्र २४ मार्च रोजी लिहिले होते. हे पत्र आता समोर आले आहे.

सर्व दावे २४ एप्रिलपर्यत निकाली काढणार
प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेंतर्गत करण्यात आलेले सर्व दावे विमा कंपनीकडून २४ एप्रिल २०२१ पर्यंत निकाली काढण्यात येतील, असे आरोग्य मंत्रालयाने ट्विट करुन सांगितले आहे. त्यानंतर नव्या विमा कंपनीशी चर्चा सुरु असून, कोरोना वॉरियर्संना नव्या योजनेमध्ये सामवून घेण्यात येईल.

मृत्यू झालेल्यांची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही
कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेले फ्रंटलाईन वर्कर्सची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही, पण इंडियन मेडिकल असोशियशनच्या दाव्यानुसार, जवळपास ७३९ एमबीबीएस डॉक्टरांनी कोरोना काळात आपला जीव गमावला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी २४ मार्च रोजी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, कोरोना महामारीच्या काळात ही योजना फायद्याची ठरली, कोरोना महामारीमुळे मृत्यू पावलेल्या आरोग्य कर्मचा-यांच्या कुटुबियांना या योजनेमुळे मोठी मदत झाली.

माजी पंतप्रधानांचा लसीकरणाचा सल्ला काँग्रेस नेत्यांनी ऐकावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या