27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयकेजरीवालांकडून नव्या राष्ट्रीय मिशनची घोषणा

केजरीवालांकडून नव्या राष्ट्रीय मिशनची घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी मेक इंडिया नंबर वन या नव्या मिशनची घोषणा केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला भारताला जगात नंबर वन बनवायचे आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी हे अभियान सुरू केले जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी देशातील १३० कोटी जनतेला चांगले आणि मोफत शिक्षण, मोफत उपचार, प्रत्येक तरुणाला नोकरी, महिलांचा सन्मान आणि शेतक-यांची समृद्धी यासाठी प्रयत्न करावे लागतील.

अरविंद केजरीवाल म्हणाले, ही स्वप्नपूर्तीची सुरुवात आहे. भारताने जगातील नंबर वन देश व्हावे अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. जगातील सर्वात श्रीमंत देशात भारताची गणना व्हायला हवी. भारत एक शक्तिशाली राष्ट्र बनला पाहिजे असे म्हणत भारत एक महान देश असून, आपली सभ्यता हजारो वर्षे जुनी असल्याचे केजरीवाल म्हणाले. एक काळ असा होता की, जगभर भारताचा डंका वाजत होता. हे लक्ष्य समोर ठेवून आपल्याला भारताला पुन्हा महान बनवायचे असून, भारताला नंबर वन बनवण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी १३० कोटी जनतेला याला जोडावे लागले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या