28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयबिहारमध्ये नवीन राजकीय वाद

बिहारमध्ये नवीन राजकीय वाद

एकमत ऑनलाईन

पाटना : बिहार मधील सत्तांतरानंतर नवीन सरकार स्थापन झालं आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी मंत्रीमंडळ विस्तार केल्या नंतर कार्तिक शर्मा अपहरण प्रकरण समोर असतानाच, तेजप्रताप यादव आणि त्यांच्या मोठी मेहुणी मिसा भारती यांचे पती शैलेश यादव हे दोघे एकत्र बैठकीला आले होते. नंतर ते अधिका-यांच्या शेजारी बसले आणि टेबल वरील कागदपत्र चाळायला लागले.

दरम्यान तेज प्रताप यादव यांनी गुरुवारी प्रदूषण नियंत्रण विभागाची बैठक आयोजित केली होती. राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती यांचे पती शैलेश कुमारही यात दिसले. नवे पर्यावरण मंत्री तेज प्रताप हे विभागाच्या अधिका-यांची बैठक घेत असताना त्यांच्या शेजारी शैलेश यादव बसले होते. शैलेश कोणत्याही अधिकृत पदाशिवाय अधिकृत बैठकीला उपस्थित राहिल्याने वाद निर्माण झाला होता.

मंत्री तेज प्रताप यादव यांचे ट्विट
या वर भाजपने जोरदार टीका केली आहे. मंत्रिमंडळात स्थान नसलेल्या व्यक्तींना बैठकीला बसण्याची परवानगी कोणी दिली असे म्हणत नितीश कुमार यांना प्रश्न विचारला आहे. विशेष म्हणजे बैठकीतील फोटो मंत्री तेज प्रताप यादव यांनी स्वत:हा ट्विट केला आहे. नंतर त्याचे ट्विटर स्क्रोल करताना ते ट्विट सापडले नाही. वाद वाढल्यानंतर त्यांनी ते हटवले. मात्र त्याचा स्क्रीन शॉट घेऊन भाजप नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता आरजेडीची संपूर्ण ब्रिगेड लालूंच्या मदतीला आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या