24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयराज्यसभेत नवा विक्रम, महिला खासदारांची संख्या ३२ वर

राज्यसभेत नवा विक्रम, महिला खासदारांची संख्या ३२ वर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील अर्थात राज्यसभेतील महिला सदस्यांची संख्या आता ३२ वर पोहोचली असून हा देशाच्या राजकीय इतिहासात विक्रम नोंदविल्या गेला आहे.

राज्यसभेच्या ५७ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यसभेच्या महिला सदस्यांची संख्या आता ३२ झाली आहे. त्यांच्या शपथविधीनंतर राज्यसभेतील महिला प्रतिनिधीत्वाचा नवा विक्रमही प्रस्थापित होणार आहे. यापूर्वी २०१४ मध्ये राज्यसभेत सर्वाधिक ३१ महिला सदस्य होत्या. वरिष्ठ सभागृहातील कार्यकाळ संपणा-या ५७ सदस्यांमध्ये पाच महिला सदस्यांचा समावेश होता. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या अंबिका सोनी, छत्तीसगडमधून काँग्रेसच्या छाया वर्मा, मध्य प्रदेशमधून भाजपच्या समतिया उईके आणि बिहारमधून राष्ट्रीय जनता दलाच्या मीसा भारती यांचा समावेश होता.

त्यापैकी निर्मला सीतारमण आणि मीसा भारती या पुन्हा एकदा राज्यसभेत परतल्या आहेत. सीतारमण कर्नाटकमधून तर भारती बिहारमधून पुन्हा राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. छाया वर्मा, उईके आणि सोनी यांना त्यांच्या पक्षांनी उमेदवारी दिलेली नव्हती. कार्यकाळ संपणा-या पाच महिला सदस्यांसह सध्या राज्यसभेच्या एकूण २३२ सदस्यांमध्ये महिला सदस्यांची संख्या २७ आहे. यामध्ये १० महिला सदस्या भाजपच्या आहेत. सध्या राज्यसभेत सात नामनिर्देशित सदस्यांसह १३ जागा रिक्त आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या