32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeराष्ट्रीय२४ तासांची सूट हवी असल्यास फास्टॅग अनिवार्य

२४ तासांची सूट हवी असल्यास फास्टॅग अनिवार्य

एकमत ऑनलाईन

पैसे देऊन टोल भरल्यास परतीच्या प्रवासात सूट नाही

नवी दिल्ली : सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर टोल टॅक्स डिस्काऊंटसाठी फास्टॅग अनिवार्य केला आहे. जर तुमच्या गाडीवर फास्टॅग असेल तर टोलमध्ये सवलत मिळणार आहे. यासंदर्भात एक गॅझेट नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गांवर २४ तासांच्या आत करण्यात येणा-या परतीच्या प्रवासावर टोलमध्ये सूट दिली जाते. नव्या नियमानुसार पैसे देऊन टोल भरला आणि २४ तासांत परत आला तर टोलमध्ये सूट मिळणार नाही.

२४ तासांमध्ये परतीच्या प्रवासासाठी देण्यात येणारी सूट हवी असल्यास फास्टॅग अनिवार्य असेल, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून देण्यात आली. ज्या प्रवाशांना २४ तासांच्या आत प्रवासासाठी टोलमध्ये सूट हवी असेल किंवा अन्य स्थानिक सूट हवी असल्यास त्यांना आपल्या गाड्यांवर व्हॅलिड फंक्शनल फास्टॅग लावणे अनिवार्य असेल. डिजिटल टोलला चालना देण्यासाठी नवा नियम लागू केल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून सांगण्यात आले. कोणत्याही प्रकारे मिळणारी सूट आणि त्यासाठी द्यावी लागणारी रक्कम ही प्रीपेड इन्स्ट्रूमेंट्स. स्मार्ट कार्ड किंवा फास्टॅगद्वारे किंवा तत्सम डिव्हाईसद्वारे केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

या नव्या प्रक्रियेसाठी सरकारने नॅशनल हायवेज फी (डिटरमिनेशन ऑफ रेट्स अँड कलेक्शन) रूल्स २००८ मध्ये बदल केल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. याअंतर्गत २४ तासांच्या आत परतीच्या प्रवासासाठी फास्टॅगच्या खात्यातून टोल वसुलीची रक्कम कापली जाणार आहे. यामध्ये त्या प्रवासासाठी देण्यात येणारी सूटही दिली जाईल. तसेच कोणत्याही प्रकारची पावती ठेवण्याचीही गरज भासणार नाही.

लातूर-नांदेड मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांचा मनसेकडून सत्कार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या