24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयविद्यापीठांचे नवे सत्र ऑक्टोबरपासून

विद्यापीठांचे नवे सत्र ऑक्टोबरपासून

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने विद्यापीठ आणि महाविद्यालयांना परीक्षांसाठीची नियमावली शनिवार दि़ १७ जुलै रोजी जाहीर केली असून, कोरोना संसर्गामुळे या वर्षीचं सत्र सुरू करण्यास उशीर झाला आहे आणि परीक्षाही होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आता आयोगाने सर्व विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना परिक्षांबद्दलचे निर्देश दिले आहेत.

आयोगाने सांगितले की, २०२१-२२ च्या सत्रासाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी आणि उरलेल्या रिक्त जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. त्याशिवाय सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना १ ऑक्टोबर रोजी नवे शैक्षणिक वर्ष सुरू करावे अशा सूचना आयोगाने केल्या आहेत. तसेच परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन किंवा मिक्स पद्धतीने ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे यूजीसीने सांगितले की १२वीच्या सर्व बोर्डांच्या परिक्षांचा निकाल ३१ जुलैपर्यंत लागेल. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी. सत्र परीक्षा घेण्याचाकिंवा सत्र संपल्यानंतर सुट्ट्या देण्याचा निर्णय त्या त्या शिक्षणसंस्थांचा राहील.

टायपिस्टच्या चुकीने बलात्कारातील आरोपी सुटला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या