28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयनवीन स्ट्रेन भारतामधील रुग्णवाढीसाठी कारणीभूत; डब्ल्यूएचओकडून खुलासा

नवीन स्ट्रेन भारतामधील रुग्णवाढीसाठी कारणीभूत; डब्ल्यूएचओकडून खुलासा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनाच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारतात कोरोनाच्या विस्फोट होण्यामागील विविध कारणे सांगितली असून, कोरोनाचा नवीन स्ट्रेन भारतामधील रुग्णवाढीसाठी कारणीभूत आहे. हा नवीन स्ट्रेन अधिक लोकांना संक्रमीत करतो शिवाय मृत्यूचे प्रमाणही आधिक आहे. तसेच देशातील संथ लसीकरणही यासाठी कारणीभूत असल्याचे डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.

दुस-या लाटेमुळे भारतात कोरोनाचा विस्फोट झाला असून, लागोपाठ चौथ्या दिवशी चार लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत आणि चार हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीमागे अनेक कारणे आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, भारतात आपण कोरोना महामारीचे रौद्र रुप पाहत आहे. यावरुन येथील कोरोना स्ट्रेन घातक असल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारीपासून वाचण्याचा एकमेव उपाय म्हणजे लसीकरण होय. भारताने वेगाने लसीकरण करायला हवे. अन्यथा अनेकांचा जीव जाऊ शकतो.

महिनाभरापासून भारतात तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. मागील चार दिवसांपासून हा आकडा चार लाखांच्या पुढे गेला आहे. देशात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ऑक्सिजनअभावी अनेकांचा जीव जात आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीमध्ये ऑक्सिजन बेड नसल्यामुळे हाहाकार माजला आहे. भारताची आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अनेक तज्ज्ञांनी भारतात होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवीन स्ट्रेन खूपच धोकादायक
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ सौम्­या स्वामीनाथन म्हणाल्या की, कोरोनाचा नवीन स्ट्रेन (बी.१.६१७) भारतामध्ये ऑक्टोबरमध्ये मिळाला होता. सध्याच्या भारतातील कोरोना विस्फोटास कोरोनाचा नवीन स्ट्रेनच कारणीभूत आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन दररोज लाखो लोकांना संक्रमित करत असून हजारोंचा बळी घेत आहे. हा नवीन स्ट्रेन खूपच धोकादायक आहे. शरिरात तयार होणा-या अँटिबॉडीजही रोखतो. तसेच आधीच्या स्ट्रेनपेक्षा अधिक वेगाने म्यूटेट होतो. ब्रिटेन आणि अमेरिकाही या स्ट्रेनला अतिशय गंभीरतेने घेत आहे.

कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी नाही
नवीन स्ट्रेनने भारतात हाहाकार माजावला आहेच. पण कोरोनाच्या विस्फोटास लोकही तितकेच जबाबदार असल्याचा ठपका सौम्या यांनी लगावला आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी करणे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन न करणे आणि मास्क न वापरण्यामुळेही भारतात कोरोनाचा उद्रेक झाला आहे, असे त्या म्हणाल्यात. प्रधानमंत्री मोदी आणि अन्य राजकीय नेत्यांनी घेतलेल्या प्रचारसभांमुळेही भारतात कोरोनाची मोठी लाट आली आहे. प्रचारसभामध्ये झालेल्या गर्दीमुळे कोरोनाचे संक्रमण अधिक वेगाने झाले. तसेच पहिल्या लाटेनंतर कोरोनाचा नायनाट झाल्याची मत भारतीयांनी तयार केलं, असं डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या.

नांदेड जिल्ह्यात २ हजार १४२ रेमडेसिविरचे वाटप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या