17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयनवनियुक्त सीडीएस अनिल चौहान यांना मिळणार दिल्ली पोलिसांची झेड सुरक्षा

नवनियुक्त सीडीएस अनिल चौहान यांना मिळणार दिल्ली पोलिसांची झेड सुरक्षा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नवनिर्वाचित चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांना दिल्ली पोलिसांची झेड श्रेणीचे सशस्त्र सुरक्षा कवच देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर नऊ महिन्यांनंतर सरकारने २८ सप्टेंबर रोजी लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली. जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर सीडीएसचे लष्करी पद रिक्त झाले होते. लेफ्टनंट जनरल चौहान हे मे २०२१ मध्ये ईस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले असून त्यांना जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील दहशतवादाविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या