21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमनोरंजनउर्फी जावेदच्या आत्महत्येची बातमी खोटी

उर्फी जावेदच्या आत्महत्येची बातमी खोटी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेद नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते पण, दरवेळेप्रमाणेच यावेळीही उर्फी तिच्या कपड्यांमुळे नाही तर अन्य काही कारणांमुळे चर्चेत राहिली आहे . सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणारी उर्फी जावेद अडचणीत आली आहे.

इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून उर्फी जावेदने सोशल मीडियावर तिच्याविरोधात पसरवल्या जाणा-या खोट्या अफवांबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. उर्फीने शेअर केलेल्या फोटोत अभिनेत्रीच्या गळ्याला फास असल्याचे दिसत आहे. आणि दुस-या फोटोत श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या पोस्टवर उर्फीने लिहिले आहे, ‘हे काय होत आहे?’ या सगळ्या प्रकारामुळे उर्फी घाबरलेली दिसत आहे.

वास्तविक, उर्फीने उदयपूरमधील कन्हैयालाल हत्या प्रकरणावर सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली होती. उर्फीने आपल्या पोस्टमध्ये या हत्याकांडाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर उर्फीने उदयपूरच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिले की, अल्लाहने धर्माच्या नावावर असा बर्बरपणा कधीच स्वीकारलेला नाही. आता उर्फीच्या या पोस्टनंतर तिच्यावर संकटे येऊ लागली आहेत. सोशल मीडियावर तिच्या व्हायरल पोस्टवर धमकीचे संदेश येऊ लागले आहेत, जे खूपच धक्कादायक आहे.

एवढेच नाही तर उर्फी जावेदसोबत आणखी एक गोष्ट घडते आहे जी धक्कादायक आहे. उर्फीचा फोटो धमकीच्या संदेशासह शेअर केला जात आहे, ज्यावर फकढ असे लिहिले आहे. मीडिया रिपोर्टस्मधून मिळालेल्या बातमीनुसार, सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या खोट्या अफवा शेअर केल्या जात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या