19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीत नाइट कर्फ्यूही हटवला : हॉटेल्स सुरू होणार

दिल्लीत नाइट कर्फ्यूही हटवला : हॉटेल्स सुरू होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली, 30 जुलै : अरविंद केजरीवाल सरकारने 1 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अनलॉक ३ मध्ये नाइट कर्फ्यूला हटवलं आहे. यासह दिल्ली सहकारने हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय दिल्ली सरकारने हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिली होती.

ट्राइल बेसिसवर साप्ताहिक बाजारांना एका आठवड्यासाठी खुले करण्याची परवानगी मिळाली आहे. दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट सुधारला आहे. मात्र कोरोनाची प्रकरण अद्यापही येत आहेत. देशाची राजधानीत गेल्या 24 तासात कोरोनाची 1093 रुग्ण आढळून आले आहेत. येथे कोरोनाचा रिकव्हरी रेट 89.04 टक्के आहे. दिल्लीत आता 7.99 टक्के सक्रिय रुग्ण आहे, तर 2.93 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत आतापर्यंत 10 लाखहून जास्त चाचण्या झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1093 रुग्ण समोर आले आहेत. यासह एकूण रुग्णांची संख्या 1,34,403 पर्यंत पोहोचली आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 10,743 इतकी आहे. गेल्या 24 तासांत 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली सरकारने पहिल्यांदा केंद्र सरकारकडून 1 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अनलॉक 3 चे दिशानिर्देश जारी केले होते.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अनुसार शाळा आणि कॉलेज सध्या बंद राहतील. सोबत चित्रपटगृहांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. याशिवाय नाइट कर्फ्यू हटविण्यात आला आहे. तर जिम आणि योगा 5 ऑगस्टपासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मेट्रोवर निर्बंध आहेत.

Read More  लातूर जिल्ह्यात १ ते १५ ऑगस्टदरम्यान लॉकडाऊन असणार पण त्याचे स्वरुप आज ठरणार
Read More  कोरोनामुळे जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या