21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयनीरवचे प्रत्यार्पण अटळ?

नीरवचे प्रत्यार्पण अटळ?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील फरार हिरा व्यापारी नीरव मोदीला ब्रिटनच्या न्यायालयाने आता चांगलाच झटका दिला आहे. भारत प्रत्यार्पणाच्या विरोधातील त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली. या याचिकेला आधार नसल्याचे सांगत न्यायालयाने हा निर्णय दिला.

पंजाब नॅशनल बँकेच्या अधिका-यांशी संगनमत करून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी १४ हजार कोटींचा गैरव्यवहार केला. या प्रकरणी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाने नीरव मोदीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ब्रिटनमध्ये स्थानिक न्यायालयात न्या. सॅम्युएल गुझी यांच्यापुढे दोन वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. भारतात सुरू असलेल्या खटल्यात नीरवला तिथे हजर राहावे लागेल, असे न्या. गुझी यांनी स्पष्ट केले होते.

नीरव याच्या विरोधातील खटल्याची भारतीय न्यायालयांत नि:पक्षपाती सुनावणी होणार नाही, हा दावाही ब्रिटनच्या न्यायालयाने फेटाळला होता. तसेच नीरव याच्या वैद्यकीय गरजांची पूर्तता भारतात करण्यात येणार नाहीत, हा दावाही न्यायालयाने अमान्य केला होता. या प्रकरणात प्रथमदर्शनी नीरव मोदी याच्या विरोधात पुरावे दिसत असल्याचेही न्या. गुझी यांनी स्पष्ट केले होते.

ब्रिटन प्रत्यार्पण कायदा २००३ नुसार न्यायाधीशांनी अपला निवड्याचा अहवाल गृहमंत्र्यांकडे पाठवला होता. अखेर गृहमंत्री प्रीती पटेल यांनी प्रत्यार्पणास मंजुरी दिल्याचे ब्रिटनमधील भारतीय राजनैतिक अधिका-यांनी सांगितले. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी नीरवला १३ मार्च २०१९ रोजी अटक केली. तेव्हापासून तो वॉण्डस्वर्थ कारागृहात आहे.

पाऊस १३८ मि. मी. पेरणी २५ टक्केच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या