22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयनिर्मला सीतारामण अर्थशास्त्रात निरक्षर

निर्मला सीतारामण अर्थशास्त्रात निरक्षर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भाजप नेते आणि माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वामींनी निर्मला सीतारामन यांच्या ज्ञानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी खासदार स्वामी नेहमीच आपल्या ट्विटद्वारे मोदी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत असतात.

शनिवारी एका ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी लिहिले की, त्या (अर्थमंत्री) अर्थशास्त्रात निरक्षर आहेत, त्या काहीही बोलू शकतात. भारतातील प्रसारमाध्यमे देखील भित्रे आहेत, त्यामुळे अर्थमंत्र्यांना ते धारदार प्रश्न विचारू शकत नाहीत असे म्हणत स्वामी यांनी माध्यमांना देखील फटकारले. याआधीही सुब्रमण्यम स्वामी यांनी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर २ सप्टेंबर रोजी टीका केली होती. अर्थमंत्री सीतारामण यांनी तेलंगणात सरकारी रेशन दुकानावर पंतप्रधान मोदींचा फोटो नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावरून स्वामी म्हणाले होते की, चमचेगिरीलाही मर्यादा असतात. तुम्ही पीडीएसच्या प्रभारी मंत्र्याला पत्र लिहून मोदींचा फोटो न लावल्याबद्दल तक्रार करू शकत होत्या.

जीडीपीची योग्य गणना नाही
दुस-या ट्विटमध्ये माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी लिहिले, मोदी सरकारच्या निरक्षर मंत्र्यांसह नवशिक्यांना हेही समजत नाही की पीपीपी पद्धतीचा वापर करून जीडीपीची योग्य गणना केल्यास, २००५ पासून भारताचा जीडीपी जगातील तिसरा सर्वात मोठा जीडीपी आहे. मात्र भारत दरडोई उत्पन्नात लोकसंख्येमुळे भारत मागे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या